
विकासापासून दूर असलेल्या समाजाला संघटित करा/ प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री
मुंबई : प्रतिनिधी विकासापासून दूर असलेल्या समाजाला संघटित करावे बहुजन रयत परिषदेतर्फे आयोजितमुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री व बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले. बहुजन रयत परिषदेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 18 जुलै ते 5 सप्टेंबर असे नव निर्धार संवाद अभियान आयोजित करण्यात आले होते. याची सांगता समारोप घाटकोपर चिराग नगर येथे पार पडला. 30 जिल्ह्यांचा दौरा पार करीत ठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. शिक्षण, आरोग्य,शासकीय योजना, अंधश्रद्धेला विरोध करून व्यसनमुक्तीचा प्रचार या परिषदेतून करण्यात आला. गुटखा हा जीवघेणा आहे आपले जीवन निरोगी व्यसनमुक्त असावे असा संदेश यानिमित्त लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिला. अनुदानित वस्तीग्रह तेरी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी प्रमाणे पगार देण्यात यावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचा जमीन वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात यावा. महिला बचत गटाला राज्य सरकारने कर्जाचा आधार द्यावा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ क्रांतिसूर्य महात्मा फुले विकास महामंडळ वसंतराव नाईक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे चारही महामंडळांना एक हजार कोटींचे भागभांडवल देऊन विकास महामंडळ सुरू करावीत अशी प्रमुख मागणी बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे यांनी दिली. त्याचप्रमाणे रेशन दुकानाचा माल लोकांना वेळेवर देण्यात यावा. विर लहुजी साळवे आयोगातील 42 शिफारशी लागू करणे. संबंधी शासनाने तात्काळ अमलात आणाव्यात आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे त्याचप्रमाणे मराठा लिंगायत मुस्लिम समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी सांगितले. सदरच्या पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमास महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा एडवोकेट कोमल ताई साळुंखे उपस्थित होत्या.



