vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची सुटका करा सामाजिक कार्यकर्ते मनोज मर्चंडे यांची मागणी

डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची सुटका करा सामाजिक कार्यकर्ते मनोज मर्चंडे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी थोर विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांची निर्दोष सुटका करावी, अशी मागणी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारवंत बचाव आंदोलनाचे निमंत्रक व सामाजिक कार्यकर्ते मनोज मर्चंडे यांनी केली. पुणे पोलिसांनी एल्गार परिषद प्रकरणात डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या सोबत अन्य पंधरा जणांना अटक केलेली आहे. सध्या हे सर्वजण तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आंबेडकरी विचारवंतांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार असून मोदी सरकारने डॉ. तेलतुंबडे यांची तात्काळ सुटका करावी. महापुरुषांचे वारस कलंकित करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे याचा आम्ही निषेध करीत आहोत. येत्या दोन ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार विरोधात वरळी येथे संघर्ष आंदोलन सुरू करण्यात येणार असून यात सर्व संघटना विचारवंत आणि बुद्धिजीवी लोकांना एकत्रित घेऊन सदरचे आंदोलन पुढे नेणार आहोत असे मनोज मर्चंडे यांनी सांगितले. सदरच्या पत्रकावर परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉ. रा सु गवई गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष श्री आनंद खरात, सामाजिक कार्यकर्ते शांतू डोळस, श्रीधर जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये महिला सक्ष्मीकरण जनजागृती कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

कसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

लोणावळा येथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील पार्किंगची समस्या सुटणार, आता ऑनलाईन बुकिंग करता येणार

vishwatmaklokswamivarta

सेवाविषयक प्रकरणांसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन ‘मॅट’ च्या लोक अदालतीत १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली

vishwatmaklokswamivarta