vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी अजय दाभाडे यांची नियुक्ती

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी अजय दाभाडे यांची नियुक्ती

नांदेड प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. दाभाडे यांनी यापूर्वी विविध सिंचन प्रकल्पांवर काम केले असून त्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभव आहे

अजय दाभाडे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे. विविध मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. गोसीखुर्द प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, या प्रकल्पाकडून शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट ‘ असणाऱ्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या गतीशील अंमलबजावणीची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

नागपूर येथील सिंचन भवनातील कार्यालयात ते सध्या रुजू झाले आहे.विविध प्रकल्पातील अपूर्ण कामे पूर्ण करणे, कामांना गती देणे आणि सिंचन क्षमता वाढविणे हे दाभाडे यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामांना अपेक्षित गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

000000

संबंधित पोस्ट

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारींचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश**नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश; एसडीआरएफ पथके तैनात*

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta