vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नामवंत कंपनीची नक्कल करून ग्राहकांची फसवणूक, उल्हासनगरातून लाखोंचा माल जप्त,

ब्रॅण्डेड कंपनीची नक्कल करून ग्राहकांची फसवणूक, उल्हासनगरातून लाखोंचा माल जप्त, विठ्ठल वाडी पोलीस ठाण्याची कारवाई

ठाणे प्रतिनिधी :उल्हासनगरात एका ब्रॅण्डेट कंपनीच्या शर्ट पॅन्टची हूबेहून नक्कल करून ग्राहकांना विक्री करणाऱ्या दुकानात अँटी पायरसी सेलने विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती देऊन त्या दुकानावर धाड टाकली आहे. या धाडीदरम्यान दुकानातून लाखोंचा हुबेहूब नक्कल केलेला शर्ट-पॅन्टचा साठा जप्त करून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सियारामचा लोगो कपड्यांवर लावून विक्रीउल्हासनगर शहर उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते, या नगरीतून विविध कंपन्यांचे इलेक्ट्रानिक वस्तू व ब्रॅण्डेट कंपनीचे कपडे मोठ्या प्रमाणात देशभरात विक्री केली जाते. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर चारच्या शासकीय रुग्णलयासमोर एस. आर. डिझायनर स्टुडिओ कपड्यांचे दुकान आहे. या दुकानात सियाराम कंपनीचे शर्ट, पॅन्ट, सूट शिवून रेडिमेड मटेरियल म्हणून विकले जात होते. यासाठी सियाराम कंपनीची कोणतीही परवानगी न घेता बाहेरून शर्ट, पॅन्ट पीस आणून त्यावर सियारामचा लोगो कपड्यांवर लावून तो जास्त किंमतीला विक्री केली जात होती.कंपनीला मिळाली होती नक्कल करणाऱ्याची माहितीया दुकानातून शहरातील अनेक राजकीय नेते, प्रतिष्ठित व्यक्ती खरेदी करत असल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे. या दुकानदाराचा लबाडपणा सियाराम कंपनीचे हक्क असलेल्या संस्थेला व कंपनीला गुप्त माहितीच्या आधारे कळला होता. त्यानुसार अँटी पायरसी सेलने विठ्ठलवाडी पोलिसांना याची माहिती देऊन दुकानावर मंगळवारी धाड टाकली. या धाडीमध्ये दुकानातून तब्बल साडेतीन लाखांचे सियाराम कंपनीचे लोगो असलेले शर्ट, पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत. या सोबत शूट कव्हर, सियाराम कंपनीचे लोगोदेखील ताब्यात घेण्यात आला आहे.

 

दुकानाच्यावरच रेडिमेड कपड्याचा कारखानाया प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दुकानचालक भीमाशंकर चिंचोळे याच्यावर कॉपीराईट्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हूबेहूब नक्कल करून तयार केल्या जाणाऱ्या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दुकानाच्या पहिल्या मजल्यावरच रेडिमेड कपडे तयार करण्याचा कारखाना असून या कारखान्यात २० ते २५ टेलर काम करीत असल्याचे धाडीदरम्यान दिसून आले. तर दुसरीकडे या दुकानातून खरेदी करणाऱ्या हजारो ग्राहकांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईत आजपासून लसीकरण, मुंबई महानगरपालिका  ला मिळाले १ लाख 5 हजार कोविड प्रतिबंधक लसींचा साठा.

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस येथे ८ व्या गेटवे लिटफेस्ट चा कार्यक्रम २८ फेब्रु व १ मार्च २०२५ रोजी होणार…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागात नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta