
महिला अत्याचार प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची राज्यपालांची सूचना योग्य – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रात महिला अत्याचार प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करून महिला अत्याचार रोखण्याबाबत चर्चा करण्याची राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना केली आहे. ही सूचना अत्यंत योग्य असून राज्यातील जनतेच्या मनातील मागणी राज्यपालांनी पत्र लिहून मुखमंत्र्यांना सूचित केली आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून राज्यसरकारने त्वरित महिला अत्याचार प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बिलाविले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबईत नुकताच साकिनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष बोलविण्याची राज्यपालांची सूचना अत्यंत योग्य आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजपशासित राज्यांनी अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे अधिवेशन घेण्याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याने महिला अत्याचार रोखण्याबाबत च्या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवावी. महिला अधिकाराबाबत फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तो परंपरा जोपासत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे



