vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट; दहशतवादी संघटनांच्या भूमिकेवरून पाकिस्तानला इशारा…

पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट; दहशतवादी संघटनांच्या भूमिकेवरून पाकिस्तानला इशारा…

विदेश प्रतिनिधी विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय भेटींच्या मालिकेतील दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी करोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा झाली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे. कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हॅरिस यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. भारत कोविडशी लढत असताना एकदा संभाषण झाले होते. त्यावेळी कमला हॅरिस यांचे एकतेच शब्द मला आठवले. अमेरिकन सरकार आणि कंपन्या आणि परदेशातील भारतीय समुदाय कोविड महामारीशी अत्यंत कठीण लढाईत खूप मदत करत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि हॅरिस यांनी स्वतः अशा वेळी पदभार स्वीकारला जेव्हा संपूर्ण जगाला एक अतिशय कठीण आव्हान भेडसावत होते आणि अतिशय कमी कालावधीत त्यांनी कोविड किंवा हवामान बदलांसारख्या आपत्तींसोबत लढा देत यश मिळवले,” असे पंतप्रधानांनी म्हटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेला गेलेले परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रासह अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य या विषयांवर चर्चा केल्याचे सांगतले.

“अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमेपलीकडील दहशतवादाबाबत पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शवली आणि भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरल्याचे मान्य केले. हॅरिस यांनी अशा दहशतवादी गटांच्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही,” असे हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले.

कमला हॅरिस यांनी भारतात येण्याचे निमंत्रण

भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. “आमची मूल्ये समान आहेत आणि आमचे सहकार्य हळूहळू वाढत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून तुमची निवड ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि मला खात्री आहे की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील. भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटल

 

संबंधित पोस्ट

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

मुंबईत बिहार भवनला विरोध करण्याची राज ठाकरेंची भुमिका संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

सर्व देशवासीयांना विश्वात्मक  सामाजिक सेवा ट्रस्ट,विश्वात्मक लोकस्वामी वार्ता या परिवारा मार्फत सर्व जाहिरातदार वाचक आणि हितचिंतक आणि मार्गदर्शक यांना 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी..

vishwatmaklokswamivarta

भारतीय सैन्यात चार वर्षांसाठीच भरती केली जाणार,  ‘अग्निपथ’ विरोधात आंदोलनाचा भडका; आंदोलकांकडून ट्रेन्सची जाळपोळ…