
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.
राजस्थान प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राजस्थान येथील सवाई माधोपूर येथील भदोती येतून आज सकाळी यात्रेस सुरुवात झाली. यावेळी रघुराम राजन काही वेळासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राजस्थान येथील सवाई माधोपूर येथील भदोती येतून आज सकाळी यात्रेस सुरुवात झाली. यावेळी रघुराम राजन काही वेळासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी होतानाचा काही सेकंदांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आपल्याला माहितच असेल की काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. देशभरातील विविध राज्यांतून मार्गक्रमण करत असलेल्या या यात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.



