vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभानिवडणुक-2024-जिल्हाधिकारी यांनी घेतला पेण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा..

विधानसभानिवडणुक-2024 जिल्हाधिकारी यांनी घेतला पेण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा..

 

 

रायगड प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी पेण विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पेण येथील स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.

उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी पेण विधानसभा मतदार संघात निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार, पेण तहसीलदार तानाजी शेजाळ,उत्तम कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

निवडणूकीमध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे श्री जावळे यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला.

जिल्हाधिकारी श्री जावळे व पोलीस अधीक्षक घार्गे यांनी ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला.

0000000

संबंधित पोस्ट

माथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

लोकनेत्यांच्या चित्ररथ आणि गौरवयात्रेने पाटण तालुका दुमदुमला शासकीय योजनांच्या यात्रेचा ही केला शुभारंभ…! *तब्बल पाच तास निघाली मिरवणूक..!हजारोंच्या संख्येने तालुका झाला लोकनेतेमय..!

राज्यात पुढील पाच-सहा दिवस पावसाच्या सरीची शक्यता…

vishwatmaklokswamivarta