vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीसरकारी दरबारी पाठपुरावा,मात्र त्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याची खंत..

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीसरकारी दरबारी पाठपुरावा,मात्र त्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याची खंत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडी मेळाव्यात व्यक्त केली

वाशी प्रतिनिधी  : माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा सरकारी दरबारी पाठपुरावा केला आहे, मात्र त्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याची खंत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडी मेळाव्यात व्यक्त केली. माथाडीच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना आमंत्रण दिले होते. मंत्री येणार नसल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी दोन डोस घेतलेल्‍या शंभर माथाडींच्याच उपस्थितीत कार्यक्रम घेतला. तरी देखील मंत्र्यांनी पाठ फिरवली. राग काढायचा असेल तो वैयक्तिकरीत्‍या काढा, मात्र माथाडीचे प्रश्न मार्गी लावा, असे विचार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.माथाडी कामगारांच्या केंद्राशी संबंधित समस्या व मागण्यांची सोडवणूक करून सहकार्य करण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली. कामगारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घ्यावे, कोरोनामुळे २८ माथाडी कामगारांचे मुत्यू झाले. पण शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे केंद्राने मदत करावी. अशी मागणी पाटील यांनी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून २० हजार माथाडी कामगार व त्यांच्या परिवारला लस उपलब्ध करून दिल्‍याबद्दल त्‍यांचे आभार मानण्यात आले.एपीएमसीतील उत्‍पन्नात घट

खुल्‍या विक्रीमुळे एपीएमसीच्या उत्‍पन्नात घटआयकर विभागाच्या नवीन धोरणामुळे माथाडी मंडळे अडचणीत येणार असून, ही समस्या सोडविण्याची विनंती पाटील यांनी यादव यांना केली. मार्केटमध्ये खुली विक्रीला परवानगी देण्यात आल्‍याने एपीएमसीचे उत्पन्न कमी झाल्याने बाजारापेठा चालवणे कठीण झाल्‍याचे मत यावेळी शशिकांत शिंदे यांनी मांडले.

अण्णासाहेबांचा कामगार चळवळीतला काळ हा मान सन्मानाचा नव्हता तर संघर्षाचा होता. त्यांनी संर्घषातून निर्माण केलेल्या माथाडी कायद्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी आताच्या सर्व नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.-

संबंधित पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी बीएमसी निवडणूक एकट्याने लढवणार

vishwatmaklokswamivarta

नववी दिल्ली येथे राज्यसभेत विरोधी पक्षाचे 19 खासदार निलंबीत, .

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताची पहिलीने सर्वात पहिले स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल)एनआयएस संधायक मलेशियातील क्लांग बंदराला भेट दिली

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी : भारतीय कलाजगताला धक्का; दिग्गज कलाकाराचं निधन