vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, प्रतिनिधी : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), दादर, मुंबई येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य व्ही. जे. संखे यांनी दिली आहे.

प्रवेश अर्ज, प्रवेश पद्धती, नियमावली तसेच वेळापत्रक यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रवेश संकेतस्थळ admission.dvet.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अथवा इतर शंकांचे निरसन करण्यासाठी संचालनालयाच्या मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मदत कक्षाशी संपर्क साधण्यापूर्वी उमेदवारांनी माहितीपुस्तिकेचा अभ्यास करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑगस्ट 2026 सत्रासाठी संस्थेमध्ये कम्प्युटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क मेंटेनन्स या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी 48 जागा उपलब्ध आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स, मॅकेनिक मोटार व्हेईकल आणि टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स या प्रत्येकी दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी 24-24 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेतील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी 9967834600 किंवा 9594026004 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. संखे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा  – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत