vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनकडून नवी मुंबईला पसंती देत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रकल्पाबाबत विचारविनीमय..

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनकडून नवी मुंबईला पसंती देत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रकल्पाबाबत विचारविनीमय..

 

         नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबईतील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता, आधुनिक स्वरूपाचे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि फुटबॉल विकासासाठी पोषक असलेले वातावरण लक्षात घेऊन अर्जेंटिनाच्या फुटबॉल असोसिएशनने (AFA) भारतातील आपल्या प्रस्तावित फुटबॉल विकास उपक्रमासाठी नवी मुंबईला प्राधान्य दिले आहे.

          या अनुषंगाने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या विशेष प्रतिनिधी मंडळाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देऊन या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेसोबत सहयोगाने काम करण्याची तयारी दर्शविली आणि पुढील सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

          यावेळी उपमहापौर श्री.दशरथ भगत, सभागृह नेता श्री.सागर नाईक, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे तसेच अर्जेंटिनाचे उप-वाणिज्यदूत इझेक्विएल एम. चाबाय आणि जोएल बालेजोस व एएफएचे प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते.

          यावेळी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ या संकल्पनेच्या माध्यमातून अर्जेंटिनामधील प्रगत फुटबॉल प्रशिक्षण पद्धती, त्याविषयी शिस्त, मूल्ये आणि समृद्ध फुटबॉल संस्कृती ही नवी मुंबईतील शाळा व फुटबॉल अकादमींपर्यंत कशा पध्दतीने पोहोचविण्यात येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती आणि भविष्यातील व्याप्ती यासोबतच नवी मुंबईतील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या स्वरूपात नियोजन करता येईल यावर सभागृह नेते श्री.सागर नाईक यांनी विस्तृत चर्चा केली.

          या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाला संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर रूपरेषा, अंमलबजावणीची कार्यपद्धती, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याचे स्वरूप यांचा समावेश असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून प्रकल्पाच्या पुढील दिशा, नियोजन आणि कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

          नवी मुंबईच्या क्रीडा विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून शहरातून विविध खेळांतील गुणवंत खेळाडू तयार व्हावेत व त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिध्द करावी व नवी मुंबई शहराचा नावलौकिक उंचवावा हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे व त्यादृष्टीने पावले उचलली जात आहे

संबंधित पोस्ट

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बुलढाण्याच्या अथर्व ताठेची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेतअमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप; 300 खेळाडूंनी घेतले .क्रीडा व मानसिक विकासाचे धडे..

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव