vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस…

 

बुलढाणा, प्रतिनिधी : शून्य ते पाच वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा धोका टाळण्यासाठी व संपूर्ण उच्चाटनासाठी भारत सरकारद्वारे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज पासून देशभर राबविली जात आहे. शून्य ते पाच वयोगटातील सुमारे 15.6 करोड बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल

पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत २८ जून रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील आरोग्य लसीकरण बुथला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन लसीकरणासाठी आलेल्या बालकाला पोलिओचा डोस पाजला.

या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून देशांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी लसीकरण बूथ उभारण्यात आले आहे. बूथवरील लसीकरणानंतर पुढील पाच दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. ‘पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर आणून लसीकरण करून घ्यावे’ असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद! सर्वांना ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच प्रवेश…

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

श्रम शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार – कामगार मंत्री ॲड. फुंडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये सामंजस्य करार

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे संपन्न…

vishwatmaklokswamivarta

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज- आशिष फुलुके- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ