vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; क्यू आर कोड वर व्हिडीओ द्वारे सुधारित माहिती उपलब्ध करून देणार

इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; क्यू आर कोड वर व्हिडीओ द्वारे सुधारित माहिती उपलब्ध करून देणार

पुणे, प्रतिनिधी : इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोषांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने संबंधित त्रुटींची दखल घेण्यात आली असून, त्या पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित बदलांचा व्हिडीओ तातडीने क्यू आर कोड द्वारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पाठयपुस्तक मंडळ, पुणे कडून सांगण्यात आले आहे.

इयत्ता चौथीचे गणित पाठ्यपुस्तक एकूण १० माध्यमांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यापैकी मराठी व इंग्रजी माध्यमातील काही मुद्रणदोष निदर्शनास आले आहेत.

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०९ वर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीने २७ एप्रिल १९२० अशी छापली गेली आहे. त्याऐवजी २६ एप्रिल १९२० ही योग्य तारीख असून, हा मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५५ वरील स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक १ मधील ‘जोड्या लावा’ या भागात ‘१००० ग्रॅमपेक्षा जास्त’ असे छापले गेले आहे. त्याऐवजी ‘१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त’ असे असणे अपेक्षित होते. ही त्रुटी केवळ मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असून तीही पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ७७ वर खालून चौथ्या ओळीत ‘of’ ऐवजी ‘of ₹1.’ तसेच खालून तिसऱ्या ओळीत ‘₹1.49 rupees’ ऐवजी ’49 rupees’ असे असणे अपेक्षित होते. ही चूकही केवळ इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असून पुढील आवृत्तीत आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित सुधारित बदलांचा व्हिडीओ पाठ्यपुस्तकातील QR Code द्वारे तातडीने अपलोड करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने कळविले

00000

संबंधित पोस्ट

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…