vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा,महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) सक्रिय असून, मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांत ६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ते बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज असून, विदर्भात जवळपास सर्वच भागांत व्यापक पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, इतर दिवशी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी कळवले आहे.

२ ते ४ जुलै दरम्यान कोकणातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ४ ते ६ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय ३० जून ते ४ जुलै या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, शहरी भागातील रस्ते जलमय होणे, तसेच घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक व रस्त्यांची अद्ययावत माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे

शेतीविषयक सल्ला देताना, भातशेती व भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला पशुपालकांना देण्यात आला आहे.

00000

 

 

00000

संबंधित पोस्ट

सातारा तालुका पंचायत समिती सदस्य पदासाठी आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी*

vishwatmaklokswamivarta

गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता**मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22 हजार 611 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता*

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक सरसकट पंचनामे करा-पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

CoffeewithCollector उपक्रमांतर्गत #जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

शिक्षक साहित्यसंमेलन साहित्यामुळे जीवन प्रेरणा मिळते- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta