vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्म पुरस्कार-2027 साठी नावे सादर करावीत

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्म पुरस्कार-2027 साठी नावे सादर करावीत

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी –समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व असामान्य योगदान दिलेल्या जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्म पुरस्कार 2027 साठी नावे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कला, समाजकार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, व्यापार व उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, उत्कृष्ट प्रशासकीय सेवा, क्रीडा व योगा, तसेच भारतीय संस्कृती, मानवी हक्क, वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे सुचविता येतील

इच्छुक नागरिकांनी किंवा संस्थांनी संबंधित व्यक्तीच्या कार्याचा संक्षिप्त परिचय व आवश्यक माहिती/कागदपत्रांसह नामांकन प्रस्ताव संबंधित तहसील कार्यालयामार्फत अथवा थेट जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडे दि.15 जुलै 2026 पर्यंत सादर करावा. अधिकाधिक पात्र व्यक्तींची नावे पुढे यावीत, यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, रायगड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

००००००

संबंधित पोस्ट

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास विधी सेवा प्राधिकरणात दावा दाखल करता येणार   – सचिव गि. ग. कांबळे- कायदेशीर वारसांना सहा लाखांची भरपाई- मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कठोर परिश्रम आणि कौशल्य हाच यशाचा खरा मंत्र – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना;शासनाकडून प्रोत्साहनपर निधी वितरित- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक