vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या भव्य रक्तदान शिबिर

डॉक्टर्स डे निमित्त संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या भव्य रक्तदान शिबिर

जालना,  प्रतिनिधी: राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, खरपुडी रोड, मंठा बायपास, जालना यांच्या वतीने शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर आधार ब्लड बँक, जालना यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आयोजित या उपक्रमात निरोगी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असेही आयोजकांनी म्हटले आहे

शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास रक्तगट नमूद असलेले ओळखपत्र तसेच सवलत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या उपक्रमाचे आयोजन संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रोहित सुरेश कासट, डॉ. कुलभूषण आर. मराठे, डॉ. विपिन कासट आणि डॉ. विकास कातारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे

रक्तदान शिबिराबाबत अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी आधार ब्लड बँक, जालना (मो. ९९२३९५२३७७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

कुपोषणमुक्त जालना” साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तलमिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम अंतर्गत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण व मोफत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

vishwatmaklokswamivarta

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

क्षय आरोग्य धाम येथे योगासन व ध्यान योग कार्यक्रम

राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम; आयुष्मान भारत–महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोठ्या सुधारणा लागू

vishwatmaklokswamivarta

टी.बी. मुक्त भारतासाठी “निक्षय मित्र” उपक्रमाअंतर्गत पोषण आहार किट वाटप