vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटीची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज..

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटीची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज..

नाशिक प्रतिनिधी-भारतीय हवामान विभागानं उद्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात ढगफुटीची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तातडीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ऐकलं आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रशासनानं उद्या नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा तसंच नाशिक ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावं तसंच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर आणि वणी इथलं सप्तशृंगी देवी मंदिर बुधवार सकाळपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असून दर्शनासाठी येऊ नये, असे प्रशासनाने सांगितलं आहे . तसंच गडकिल्ले, धबधबे आणि सर्व पर्यटनस्थळांवर पोलिसांची नाकाबंदी करण्यात येणार असून पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. #Rain #Nashik

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता रायगड जिल्ह्यासाठी 1.14 कोटींचे अनुदान मंजूर

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

vishwatmaklokswamivarta

नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता’ विषयावरील चित्रकला स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट