
*संत सहवासाची *आनंदयात्रींची वारी पंढरीची*
आध्यात्मिक वार्ता *संत तुकाराम महाराज पालखी : यवत…. वरवंडं *संत ज्ञानेश्वर महाराज पालखी : सासवड…. जेजुरी* 🚩⚜️🌹
*वि कारो विधाताय,**ठ कारो नीलकण्ठ ।* *ल कारो लक्ष्मीकांत,* *विठ्ठलाभिधिनीयमे ॥* *विठ्ठल ज्यामध्ये तिन्ही देव एकाच ठिकाणी आहेत. विठ्ठल म्हणजे वि-विधाता.. ब्रम्हदेव, ठ्ठ-नीलकण्ठ.. शंकर. ल-लक्ष्मीकांत.. विष्णू. यामुळेच जगातील शैव असो वा वैष्णव सर्वच पंथाची ही देवता.*
*आज माऊलींची पालखी सासवडला संत सोपानकाकांना भेटून जेजुरीकडे निघणार. महाराष्ट्रातील कुलदेवता खंडोबा ज्यांची खंडेराय मल्हारी मार्तंड ही पण ओळख. मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने घेतलेला हा अवतार.*
*विठ्ठलाच्या स्वयंभू मूर्तीत मस्तकावर शिवलिंग असल्याचा भास होतो. आज माऊलींच्या पालखीचे जेजुरीत भंडारा उधळत भव्य स्वागत होणार.. जेजुरी सोन्याची भासणार.*
*संत जेणें व्हावें ।* *जग बोलणे साहावें ॥* *तरीच अंगी थोरपण । *जया नाही अभिमान ॥* *थोरपण जेथे वसें ।* *तेथे भूतदया असें ॥* *रागें भरावे कवणाशी ।* *आपण ब्रम्ह सर्वेदेशी ॥* *ऐशी समदृष्टी करा ।* *ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥* *जनसामान्य असो वा संत, कधीतरी लोकनिंदेचा सामना हा करावाच लागतो. एक वेळ अशीही आली की लोकनिंदेने त्रस्त होत माऊलींनी स्वतःला कोंडून घेतले. तेव्हा लहानग्या संत मुक्ताबाईनी “ताटी उघडा” हा उपदेश ज्ञानेश्वरांना केला.*
*वारीत विषय असतो तो फक्त देवाच्या.. संतांच्याच कथांचा. तुकोबाही म्हणतात चरित्र ऐकावीत ती केवळ देवांची आणि संतांची. मनुष्य काय लाखो येतात.. जातात. चराचरात अर्थ असतो तो याच देवांच्या.. संतांच्या कथांत. तेव्हा साहजिकच सोपानकाकांनी लहानशा मुक्ताबाईला कसे सांभाळले.. खांद्यावर उचलून नेत कशी वारी केली इ. कथांचे रसाळ वर्णन इथे ऐकू येणारच.*
*निवृत्तीनाथ.. ज्ञानेश्वर.. सोपान आणि मुक्ताबाई. चार भावंडात सर्वात लहान मुक्ताबाई. पण प्रभाव मात्र एवढा मोठा की प्रत्यक्ष चांगदेव महाराज.. नामदेव महाराज.. गोरोबाकाका.. विसोबा खेचर अश्या अधिकाराने जेष्ठ.. श्रेष्ठ.. ज्ञानीं असलेल्या सर्वांनीच पोरसवदा या मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले.*
*ज्ञानदेवांनी.. सोपानदेवानी संजीवन समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाईंं पण चैतन्यात विलीन झाल्या. जळगावजवळ मुक्ताईनगर येथे त्यांचे समाधीस्थळ आहे. समस्त संतजन आणि वारकरी या आदिशक्तीचे रुप असलेल्या मुक्ताबाईंना आदराने “आईसाहेब” संबोधत वंदन करतात. वारीमध्ये मुक्ताईनगरची पालखी पंढरपूरला येते तेव्हा भक्तगण आईला भेटतात.*
*विठ्ठल हा अनाथांचा नाथ आहे. कृपासागर आहे. या सांसारीक भवसागरातून तारुन नेत मुक्ती देण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी आहे. मृत्युचे भय राहत नाही. सर्व संतही त्यालाच शरण जात त्याच्या सहवासात आनंदी राहतात. आपल्या मुखी विठ्ठल नाव हवे. चित्ती त्या विटेवरची मूर्ती हवी. या विठ्ठलाचे नाव घेताच मुखी गोडवा निर्माण होत अदभुत सुखाची प्राप्ती होते.* *विठ्ठल गितीं गावा,*
*विठ्ठल चित्तीं ध्यावा *विठ्ठल उभा पहावा विटेवरी* *अनाथांचा बंधू विठ्ठल कृपासिंधु**तोडी भवबंधु यमपाश* *तोचि शरणांगतां विठ्ठल मुक्तीदाता *विठ्ठल या संतांसमागमें* *विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि* *लागली समाधि विठ्ठल नामें* *विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख* *गोडावलें मुख तुका ह्मणे*🌺🥀🚩🌸🛕🌸🚩🥀🌺
*रचना : संत तुकाराम* ✍ *संगीत : राम फाटक* *स्वर : पं. भीमसेन जोशी* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ॥* *॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥* *॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥* ‼ *जय जय रामकृष्ण हरी* ‼
🌻🥀🚩🌸🛕🌸🚩🥀🌻



