vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे-

मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

सांगली, प्रतिनिधी : मिरज तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध होतील. उर्वरित कामे व विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केल

मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी आमदार दिनकर पाटील, मिरजचे प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रत्येक बेघराला घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन शासनाने एका वर्षात जवळपास ३० लाख घरकुले मंजूर केली आहेत. त्यापैकी साडेसहा लाख घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे किंवा ते शक्य नसेल तर जमीन उपलब्धतेसाठी एक लाख रुपये देणे, तसेच प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसविणे, अशा विकासाभिमुख भूमिकेतून राज्य शासन विविध निर्णय घेत आहे. सांगली जिल्ह्यात ४२ हजार घरकुले मंजूर असून त्यापैकी १८ हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. याचबरोबर मिरज तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करून कोट्यवधी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील विविध महामार्गांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

संबंधित पोस्ट

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा- शेख महेमूद

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधि

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली