vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

विशेष लेखः-मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण

विशेष लेखः-मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण

विशेष प्रतिनिधी-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेस शनिवार दि.२० जून पासुन सुरुवात होणार आहे. गणना अर्जाची छपाई व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आटोपल्यावर येत्या ३० जून पासून मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पुर्वीच्या नोंदीशी जुळवणी केली जाईल. प्रारुप मतदार याद्या दि.५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया मतदार याद्या अधिक निर्दोष करण्यासाठी राबविली जात आहे. लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी व मतदारांच्या मताच्या हक्काचे संरक्षण होण्यासाठी पुनरिक्षण आवश्यक आहे. जाणून घेऊ या पुनरिक्षण प्रक्रियेविषयी-

विशेष सखोल पुनरिक्षणाचा इतिहास,भारत निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरिक्षण करण्यात येत आहे.याबाबत दि.२४ जून २०२५ रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यापूर्वी देशात सन १९५२-५६, १९५७, १९६१, १९६५-१९६६, १९८३-८४, १९८७-८८, १९९२, १९९५, २००२-२००४ या वर्षी विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले आहे.

१६ राज्यांत मोहीम,या मोहिमेचा तिसरा टप्पा १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येत आहे. संविधानाच्या कलम ३२६ प्रमाणे मतदार यादीत मतदाराचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती ही भारताचा नागरिक असणे आणि वयाची १८ वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे.

पुनरिक्षण मोहिमेचे वेळापत्रक,दि.२० ते २९ जून दरम्यान गणना अर्जाची छपाई व बीएलओ यांचे प्रशिक्षण, दि.३० जून ते २९ जुलै दरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन गणना अर्ज वाटप करुन ते भरुन अर्ज परत घेतील. दि.५ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दि.५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदविणे, ३ ऑक्टोंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, दि.७ ऑक्टोंबर रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी.

काय होणार पुनरिक्षण प्रक्रियेत?दि.३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी हे मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना अर्ज वाटप करतील. त्यात मतदारांची मतदार यादीतील सध्याची माहिती आधीच भरलेली असेल. तसेच सन २००२-२००४ मध्ये झालेल्या सखोल पुनरिक्षणातील माहिती (आई वडील/ आजी आजोबा यांची) भरलेली असेल किंवा मतदार स्वतः ही भरु शकेल. तसेच मतदारांना आपले नवीन छायाचित्रही उपलब्ध करुन देता येईल. सद्यस्थितीत या जुन्या नोंदीची जुळवणी सद्याच्या मतदारांशी केली जाईल. ही कारवाई मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. घरोघरी गेल्यावर गणना प्रपत्रात जुनी माहिती भरणे सहज शक्य व्हावे म्हणून ही पुर्वतयार करण्यात आली आहे. आता पर्यंत ७६.६० टक्के ही प्रक्रिया (मॅपिंग) पूर्ण झाली आहे.

ऑनलाईन पर्यायही उपलब्ध,आपल्या आई-वडील/ आजी आजोबा यांच्या सन २००२-०४ या कालावधीतील नोंदीची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर सहज उपलब्ध होईल. त्यासाठी केवळ मतदाराने आपले राज्य, जिल्हा, विधानसभा मतदार संघ व संपुर्ण नाव इतकी प्राथमिक माहिती भरली तरी जुन्या नोंदी सहज उपलब्ध होतील. ही मतदाराने आपल्याकडे जतन करुन ठेवावी व आपल्या घरी आलेल्या गणना कर्मचाऱ्याला उपलब्ध करुन द्यावी. घरोघरी भेटी दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी किमान ३ वेळा येईल व भेट दिल्याची नोंद ठेवेल.पुन्हा गणना पत्र गोळा करण्यासाठी हे अधिकारी भेट देतील. याशिवाय मतदार हे गणना पत्र ऑनलाईनही भरु शकतील.

प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी,प्रारुप मतदार यादी दि.५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. ज्या मतदारांची नावे पुर्वीच्या यादीशी जुळवणी झाले नसतील वा त्यात काही त्रुटी असतील अशा व्यक्तिंना नोटीस पाठवून कळविले जाईल. तसेच या याद्या नावे समाविष्ट न झाल्याच्या कारणासह संबंधित मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, तहसिल कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर इ. ठिकाणी प्रसिद्ध करणात येतील. त्यावर हरकतीही नागरिकांना घेता येतील अशी तरतूद आहे

राजकीय पक्षांचाही सहभा या प्रक्रियेत राजकीय पक्षांनाही सहभागी केले जाणार असून त्यांनीही आपले मतदान केंद्र प्रतिनिधी नेमावे, जेणे करुन ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक होण्यास मदत होईल.

जिल्ह्याची सद्यस्थिती

जिल्ह्यात एकूण मतदार ३२ लाख १७ हजार २३६ इतके असून आतापर्यंत २४ लाख ६४ हजार ५३१ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. या गणनेसाठी ३२६४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी ३२७ सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. याशिवाय ९ ईआरओ, ३३ एईआरओ नियुक्त करण्यात आले आहे

मतदारांसाठी माहितीची उपलब्धता,प्रत्येक सहायक निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या शिवाय १९५० या हेल्पलाईन क्रमांकावरही नागरिकांना माहिती उपलब्ध होईल. या शिवाय ‘बुक अ कॉल’, ही सुविधाही ECINET या मोबाईल ॲपवर उपलब्ध असेल.

-माहिती संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

संबंधित पोस्ट

राज्य रोजगार मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती..

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा —जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..