vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाअंतर्गत सैनिकी मुला मुलींचे वसतीगृह, सैनिकी विश्रामगृह, कारगिल स्मृतीवन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीन पदभरती राबविण्यात येणार आहे. या पदांसाठी माजी सैनिक, विधवांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांची माहिती याप्रमाणे-१.सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह-सहाय्यक वसतीगृह अधीक्षक-१, सहाय्यक वसतीगृह अधीक्षिका- १, चौकीदार (पुरुष-१, महिला-१) -२, सफाई कामगार (पुरुष-१, महिला-१)-२,स्वयंपाकी(महिला)-५, माळी कामगार (पुरुष-१, महिला-१)-२,

२.सैनिकी विश्रामगृह-ĺचौकीदार(पुरुष)-१, सफाई कामगार(महिला)-१.३. कारगिल स्मृतीवन-माळी कामगार(पुरुष)-२

वरील सर्व पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी अर्ज करावा. उमेदवार शारिरीक दृष्ट्या सक्षम असावा. उमेदवारांना वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवाशी दाखला, पी.पी.ओ. बॅंक पासबुक, डिस्चार्ज बुक इ. कागदपत्रांसह आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दि.२९ जून पर्यंत जमा करावे. वरील पदांसाठी माजी सैनिकांमधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य नागरिक उमेदवारांमधून पदे भरण्यात येतील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा By

चैत्राच्या सोनेरी पहाटेत, आनंदाची गुढी उभारूया, नववर्षाचे स्वागत करूया! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

vishwatmaklokswamivarta

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर