vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुसळधार पावसातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या स्व. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत…

मुसळधार पावसातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या स्व. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत…

ठाणे प्रतिनिधी  : मुसळधार पावसादरम्यान आरटीओ परिसरात झाड कोसळून धर्मवीर नगर येथील रहिवासी स्व. पांडुरंग भुवड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने स्व. भुवड यांच्या कुटुंबीयांना ₹५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर झालेली ₹४ लाखांची तातडीची आर्थिक मदतही त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.

याशिवाय, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्व. भुवड यांच्या कुटुंबाला ₹१० लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्याचा तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला महापालिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला येत्या महासभेत तातडीने मान्यता मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रसंगी स्व. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना भविष्यातही आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देण्यात आली.

उपायुक्त मधुकर बोडके यांनी देखील एक महिन्याचा पगार या कुटुंबाला दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यास 5 मे पर्यंत मुदतवाढ

महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न..

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला

पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवा अशा विविध बाबींचा**आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून सविस्तर आढावा*