vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील युवक-युवतींना होत असून, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

या प्रशिक्षणात वैश्णवी भालेराव, राखी सेवक, चैतन्य जोशी, उमा परिहार आणि अक्षय परिहार यांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदविला. प्रशिक्षणामध्ये ड्रोनची रचना व कार्यपद्धती, सुरक्षित उड्डाण, शासकीय नियम व परवानग्या, कृषी फवारणी, भू-सर्वेक्षण, मॅपिंग, हवाई छायाचित्रण, व्हिडिओग्राफी आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

 

या प्रशिक्षणामुळे सहभागींच्या कौशल्यात लक्षणीय वाढ झाली असून कृषी सेवा, औद्योगिक सर्वेक्षण, डिजिटल कंटेंट निर्मिती, ड्रोन ऑपरेशन सेवा तसेच विविध तंत्रज्ञानाधारित व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सहभागी युवक-युवतींनी सांगितले.

 

जिल्हा व्यवस्थापक जिगेश कमाणी यांनी अधिकाधिक युवक-युवतींनी अमृतच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. इच्छुकांनी अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्र. ३०८, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९९२२२७९६३७ किंवा ७३८७९२५२१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

0000

 

 

संबंधित पोस्ट

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास16 कोटी निधीतून 6167 हेक्टरवर जलसंधारण,11 हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार फायदा

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा कुटुंबीयांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर