vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

मुंबई, प्रतिनिधी प्रतिनिध

: मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै, 2026 रोजी स. 11.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Kविधानसभा मतदारसंघात समाज मंदिर हॉल, सरदार नगर नं. 1, महानगरपालिका शाळेसमोर, सायन (पू), मुंबई-400 022 येथे, 181-माहिम विधानसभा मतदार संघासाठी रविंद्र नाट्य मंदिर, सिध्दिविनायक मंदिराजवळ, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025 येथे तर 185-मलबार हिल विधानसभा मतदारसंघात शारदा मंदिर हायस्कूल, तळमजला, शारदा मंदिर हॉल, शिवतापी बिल्डींगजवळ, जे.के. टॉवर च्या समोर, गोरेगावकर मार्ग, गावदेवी, मुंबई-400 007 येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये

22 जुलै, 2026 ते 2 ऑगस्ट, 2026 या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्याबाबत शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांसोबतच केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे विविध विभाग/स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील विविध योजनांचा लाभ तसेच सेवा हमी कायद्यानुसार द्यायच्या सेवा (जसे विविध दाखले, नवमतदारांची नोंदणी, संजय गांधी निराधार योजना अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुदान, शिधापत्रिकेसंबंधित सेवा, मत्स्य ‍विभागाकडील विविध सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, क्रीडा विभागाकडील योजना इ.चा) लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

 

तरी सर्व नागरिकांनी या योजनांचा तसेच सुविधांचा.

संबंधित पोस्ट

💧 मुंबईसाठी दिलासादायक बातमी! वैतरणा धरण ९५% भरले, आणि हजारो क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

जागर स्त्रीशक्तीचा संवाद कार्यशाळासशक्त समाज निर्मितीत महिलांची भुमिका मोलाची- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta