vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून आढावा राजधानीत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून आढावा राजधानीत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी..

बॉलीवूड प्रतिनिधी-

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे झालेल्या बैठकीत देशाच्या राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेतला. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे जनपथ येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये 7 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीची सांस्कृतिक समृद्धी राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे.

या बैठकीस महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, विवेक गर्गे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन सरदारे, अभिजित गोडबोले, रामदास चव्हाणके आणि राजकुमार महाजन उपस्थित होते. चित्रपट प्रदर्शन, मान्यवरांचे स्वागत, प्रेक्षक व्यवस्थापन, नोंदणी प्रक्रिया, तांत्रिक सुविधा, प्रसिद्धी, सुरक्षा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन या सर्व बाबींचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. महोत्सवाचे आयोजन उच्च दर्जाचे आणि संस्मरणीय व्हावे, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी संबंधितांना दिल्या. दिल्लीच्या सांस्कृतिक विश्वात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा अधिक ठळक करणारा आणि मराठी सिनेमाला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात हा महोत्सव यशस्वी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

‘सिनेमा • संस्कृती • संवाद’ या संकल्पनेवर आधारित हा तीन दिवसीय महोत्सव मराठी चित्रपटांच्या आशयवैविध्याची ओळख देशभरातील रसिकांना करून देणारा ठरणार आहे. महोत्सवाची सुरुवात बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद -2’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने होणार असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळविलेल्या ‘स्थळ’, ‘घबाडखुंड’ यांसह विविध दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. इतर भाषिक प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी सर्व चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह दाखविण्यात येणार आहेत.

 

चित्रपट प्रदर्शनाबरोबरच चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. भीम सभागृहात उद्घाटन, समारोप आणि प्रमुख चित्रपटांचे प्रदर्शन होईल, तर नालंदा सभागृहात पटकथा लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या विषयांवरील मास्टरक्लास आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. समरसता सभागृहात माहितीपट आणि लघुपटांचे प्रदर्शन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंवर चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असला तरी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 29 जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, अधिकृत संकेतस्थळ अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातून रसिकांनी आगाऊ नोंदणी करून आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

 

संबंधित पोस्ट

दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

१४ मार्च अभिनेता दादा कोंडके स्मृतिदिन जन्म – ८ ऑगस्ट १९३२ (मुंबई)स्मृती – १४ मार्च १९९८ (दादर,मुंबई)

बॉलीवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात…

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत वाढवली

vishwatmaklokswamivarta

१२ एप्रिल रोजी ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये बासरी आणि सुंद्री वादन जुगलबंदी, रोजी दत्त पंडीत यांचे गायन*रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य *

vishwatmaklokswamivarta

कोकणची मुख्य समस्या जगासमोर आणतो आणि कोकणाचे अमर्याद सौंदर्य पर्यटन जगाला दाखवतो असा हा चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” चित्रपटाची स्क्रीनिंग,माती आणि नाती जपणारा चित्रपट-  संजय यादवराव समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स 

vishwatmaklokswamivarta