vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहनजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहनजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

सातारा प्रतिनिधी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 1 हजार 206 गावांमधील 31 हजार 556 शेतकरी पात्र ठरले असून, संबंधित गावांमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली आहे.

 शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केल्यानंतर त्याची सखोल पडताळणी करून ही पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडील 41 हजार 421 शेतकऱ्यांची तर राष्ट्रीयकृत व कमर्शियल बँकांकडील 11 हजार 201 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. कर्जमुक्तीचा लाभ थेट खात्यात जमा होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे.

 जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी या केंद्रांवर जाऊन आधार प्रमाणीकरण करून आपल्या कर्ज खात्याची पडताळणी करू शकतात. आतापर्यंत सुमारे 63 टक्के पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित 37 टक्के शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून लाभाची रक्कम खात्यात जमा करता येईल. तसेच ई-केवायसी करताना आधार किंवा कर्ज खात्याच्या माहितीत तफावत आढळल्यास, सेवा केंद्रावरूनच ऑनलाइन तक्रार दाखल करता येईल. या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. योजनेच्या लाभासाठी ॲग्री-स्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही, त्यांनी ई-केवायसी करत्यावेळीच ही नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री. सुद्रीक यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

१५० दिवस ई गव्हर्नन्स उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा गौरव अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर व अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी स्विकारला सत्कार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि. ९)

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेतील सहभागासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण..मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही,स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन..

vishwatmaklokswamivarta