vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रक्षाबंधनानिमित्त रेल्वे डाक सेवा काउंटरवर रात्री उशिरापर्यंत बुकिंग सुविधा

रक्षाबंधनानिमित्त रेल्वे डाक सेवा काउंटरवर रात्री उशिरापर्यंत बुकिंग सुविधा

    अमरावती, प्रतिनिधी : रक्षाबंधन सणा निमित्ताने राखी,भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगसाठी नागरीकांच्या सोयीकरिता अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे डाक सेवा काउंटर दुपारी ४ ते रात्री १०.३० पर्यंत सुरु ठेवण्यात आल्याचे रेल्वे डाक सेवा नागपूरचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.

  ग्राहकांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखीचे पार्सल वेळेवर रवाना व वितरीत करता यावे म्हणून कार्यालयीन वेळेनंतरही रात्री उशिरापर्यंत रेल्वे डाक सेवा काउंटरवर बुकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काउंटरवर ग्राहकांसाठी स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल व पार्सल सेवा उपलब्ध असणार आहेत. या सेवेचा जास्तीत-जास्त लाभ घेवून देश व परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी ,भेटवस्तू , मिठाई व इतर सणासुदीच्या वस्तू वेळेवर पोहचविण्यासाठी ग्राहकांना आगावू बुकींग करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.    

महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta

शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री ना. संजय राठोड ‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा

vishwatmaklokswamivarta

  वारणा धरणात 12.50 टी.एम.सी. पाणीसाठा