vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

लातूर, प्रतिनिधी: रंगरूट प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), लातूर येथे आर.सी.डब्ल्यू.ए.च्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. आरसीडब्ल्यूएच्या अध्यक्षा बसमी शौकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अधिकारी व जवानांच्या कुटुंबातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आरटीसी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, हरित क्षेत्राचा विस्तार आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

यावेळी बसमी शौकत यांनी ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

****

संबंधित पोस्ट

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत  

भेसळयुक्त खवा व पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आदेश

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

vishwatmaklokswamivarta

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta