vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काश्मीरच्या जंगलातील घातक एन्काऊंटरमध्ये पाकिस्तानी कमांडो..

काश्मीरच्या जंगलातील घातक एन्काऊंटरमध्ये पाकिस्तानी कमांडो..

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील जंगलामध्ये मागच्या आठ दिवसांपासून सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (J&K Encounter) सुरु आहे. या चकमकीची भीषणता लक्षात घेतली, तर दहशतवाद्यांना पाकिस्तानी कमांडोजनी ( प्रशिक्षित केलं आहे. लष्कर (army) आणि पोलिसातील (police) सूत्रांनी ही माहिती दिली. मागच्या सोमवारपासून ही चकमक सुरु असून आतापर्यंत भारताचे नऊ जवान शहीद झाले आहेत. यात दोन ज्यूनिअर कमिशनड ऑफिसर्सचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काही वर्षातील ही अत्यंत भीषण अशी चकमक आहे. या एन्काऊंटरमध्ये कुठल्या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण दहशतवाद्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत. दहशतवादी लपवल्याचा संशय असलेल्या भागाला घेराव घातलेला आहे. आठ ते नऊ किलोमीटरच्या परिसरात घनदाट जंगलामध्ये ही चकमक सुरु आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

१० ऑक्टोबरच्या रात्री पूँछमध्ये नियंत्रण रेषेजवळ असलेल्या डेरा वाली गाली भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली. यात पाच जवान शहीद झाले. सैन्याकडून शोध मोहिम सुरु असताना गुरुवारी नार खास भागामध्ये घात लावून हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जवान शहीद झाले. आणखी दोन जेसीओ बेपत्ता होते. अत्यंत कठीण अशा शोध मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: भाजप नेत्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा; शिवसेनेची टिका

 

 

हे दहशतवादी इतक्या मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी घडवू शकले तसचं हजारो जवान तैनात असूनही निसटण्यात यशस्वी ठरले, निश्चित यांना पाकिस्तानच्या एलिट कमांडोसनी ट्रेन केलं आहे, असं लष्कर आणि पोलिसातील सूत्रांच म्हणणं आहे. “या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी कमांडो असण्याचीही शक्यता आहे. त्यांचा खात्मा केल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांना सर्तकतेने ऑपेरशन करण्याचं आणि आणखी जिवीतहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लष्कराचे पॅरा कमांडोसही या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी या दहशतवाद्यांची घेराबंदी केली आहे. लवकरच या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येई

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणाच्या मुद्दा : मनोज जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तब्येत खालावली, डॉक्टरांना तपासणी करण्यासही दिला नकार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचारावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; नेत्यांनाही शांतता राखण्याचं आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे  आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी अशा सर्व सणांवरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटवले

vishwatmaklokswamivarta

भजन, कीर्तन राज्याच्या संस्कृतीचा कणा – मंत्री ॲड. आशिष शेलार कव्वाली महोत्सवाचे उद्घाटन