vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे

रायगड-अलिबाग( प्रतिनिधी:- शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर पारितोषिके जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर https://ganeshotsav.pldmka.co.in, या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.7 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियेाजन अधिकारी उमेश सुर्यवंशी यांनी केले आहे.

या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरावर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in,या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 07 सप्टेंबर 2026 असून ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

विजेत्या मंडळांना जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in,पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे https://ganeshotsav.pldmka.co.in,या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करावीत.

000000

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

vishwatmaklokswamivarta

मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत द्या;प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी

भारत अभियानः विकसित भारताची ओळखदेशव्यापी जनजागृती मोहिमेचे आयोजन

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न