vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

3 जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

    नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता रांगोळी, मेहेंदी, निबंध, पाककला, सॅलेड सजावट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, नृत्य व गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणा-या सामाजिक संस्था / महिला मंडळे यांना क्रांतीज्योजी सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते.

 या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा, योगासने, नृत्य व गायन घेण्यात आल्या असून पाककला, सॅलेड सजावट व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे या स्पर्धा दि. 03 जानेवारी 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

   3 जानेवारीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान समारंभ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिला / महिला मंडळे / महिला बचत गट यांनी दि. 03 जानेवारी 2025 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी या ठिकाणी सकाळी 9.30 वाजल्यापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

vishwatmaklokswamivarta

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज ठाणे स्टेशन येथे गिरणी कामगार संयुक्त लढा समिती वतीने ठाण्यात “स्मरण मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

वज्रेश्वरी महोत्सव – विभागीय, जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन”चे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज संपन्न.

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार…

vishwatmaklokswamivarta

नागरी सेवा देतांना येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा – अश्विन अंबेकर