vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पशुपालकांसाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत विविध अनुदानित योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन,दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासाठी ५० टक्के तर तबेलाधारकांसाठी यंत्रसामग्रीसाठी ६० टक्के अनुदान

पशुपालकांसाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत विविध अनुदानित योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन,दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासाठी ५० टक्के तर तबेलाधारकांसाठी यंत्रसामग्रीसाठी ६० टक्के अनुदान

 

ठाणे, प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालन व्यवसायाला चालना तसेच शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध अनुदानित योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र पशुपालकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.

याबाबत जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जिल्हा ठाणे डॉ. ज्योती परदेशी यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील पात्र पशुपालकांना त्यांच्या गरजेनुसार पशुधन, शेळी गट तसेच दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.

तबेलाधारकांना दुग्ध व्यवसाय अधिक सुलभ, स्वच्छ आणि फायदेशीर पद्धतीने करता यावा, यासाठी ६० टक्के अनुदानाने विविध यंत्रसामग्री व साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन, Fly Repellant Machine किंवा 3 Cow Mat यांसारख्या आवश्यक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. आधुनिक साधनसामग्रीच्या वापरामुळे पशुपालनातील श्रम कमी होऊन दुग्ध व्यवसायाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ५० टक्के अनुदानावर एक संकरित गाय किंवा एक म्हैस वाटप योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेमुळे पात्र पशुपालकांना दूध उत्पादनाच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळविण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यास हातभार लागणार आहे.ग्रामीण तसेच आदिवासी भागातील कुटुंबांना पशुपालनाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी ५० टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत ५ शेळ्या + १ बोकड अशा स्वरूपात शेळी गटाचा लाभ देण्यात येणार आहे. शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी उपयुक्त व्यवसाय असल्याने या योजनेमुळे त्यांच्या उपजीविकेला बळ मिळणार आहे.जिल्हा परिषद ठाणेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी https://zpthaneschemes.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नवीन नोंदणी करून संबंधित योजनेची निवड करावी. अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करून त्याची पावती जतन करावी.

योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया आणि इतर संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी योजनेच्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचून अर्जातील सर्व माहिती अचूक भरावी.

जिल्हा परिषद ठाणेमार्फत ग्रामीण व आदिवासी भागातील पशुपालकांसाठी विविध अनुदानित योजना राबविण्यात येत आहेत. पशुपालन व दुग्ध व्यवसायाला आधुनिक साधनसामग्रीची जोड देऊन पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हा या योजनांचा उद्देश आहे. पात्र पशुपालकांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा आणि विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले

जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करून उपलब्ध अनुदानित योजनांचा लाभ घ्यावा. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याबरोबरच पशुपालक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणेचा पशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने करण्यात आले आहे.

००

संबंधित पोस्ट

जीएसटी अभय योजना; लाभ घेण्याचे आवाहन कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अर्ज दाखल करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत..

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; ३८ जणांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta

सारथीच्या कृषी व कृषीपूरक प्रशिक्षण योजनांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात

व्यवसाय सुरु करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*