vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढइयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढइयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा

जालना, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहातील इयत्ता 11 वी, इयत्ता 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्वाधार योजनेच्या लाभासाठी वसतिगृह प्रवेशाचा अर्ज आवश्यक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी विहित मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन 30 ऑक्टोबर, 2026 पूर्वी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा!जिल्हा प्रशासन व लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार;पर्यटन विकासाला मिळणार नवी गती..

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचा दर जाहीर न झाल्यामुळे   शेतकरी संघटनांनी ऊस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय केल्याने वाहतूक ठप्प…

vishwatmaklokswamivarta

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला ​​अटक; लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप..

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta