vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन    :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन    :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

                मुंबई, प्रतिनिधी : मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ठिकाणी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील रोजगारइच्छुक युवक-युवती, उद्योजक तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

    ‘रोजगार महाकुंभ हा राज्यव्यापी उपक्रम असून युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तो राबविण्यात येत आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक-युवतींनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग, कंपनी व आस्थापनेने रिक्त पदांची नोंदणी करून या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.

  मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रस्तावित रोजगार मेळाव्यांची ठिकाणे १. लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट, जोगेश्वरी पूर्व, मुंबई ४०००६०,२. एआयसीएमईयूज् प्रायव्हेट आयटीआय, ट्रॉम्बे, मानखुर्द पूर्व, मुंबई ४०००८८ ३. द चिल्ड्रेन्स एड सोसायटी आयटीआय, मानखुर्द पूर्व, मुंबई ४०००८८ ४. सॅपिओ ॲनालिटिक्स, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०, ५. नवजीवन पॉलिटेक्निक, भांडुप पश्चिम, मुंबई ४०००७८ ६. सोबती फाउंडेशन मुंबई, इंदिरानगर, कांजूरमार्ग पूर्व, ७. क्वास्टेक, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२ ८. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरिवली, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ ९. झगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर स्पेशलाइज्ड डिग्री कॉलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ १०. ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७० ११. के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, विद्याविहार पूर्व, मुंबई ४०००७७ १२. श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) १३. बीई३ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, चेंबूर पश्चिम, मुंबई ४०००८९ १४. असॉर्ट १ कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई ४०००७२ १५. द बॉम्बे स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ १६. एलए टेक्नॉलॉजीज, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१ १७. उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई ४०००४९ १८. श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय, कामा लेन, घाटकोपर पश्चिम येथे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत तरी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अथवा जिल्हा कार्यालयामार्फत नोंदणी करावी. मेळाव्याला उपस्थित राहताना शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेंद्र भगत यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

सातारा येथे तमाशा महोत्सवाचे उदघाटन सपन्न सातारा नगरीत लोकनाटय तमाशा पाच दिवस रंगणार  राज्यातील विविध तमाशा मंडळाचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत—किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

सुरंगीच्या सुगंधाने निसर्गोद्यान दरवळणार – महापौर, आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

बोखारा ग्रामपंचायतीतील  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे