vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आज माहितीपट

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आज माहितीपट

गुजरात प्रतिनिधी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146व्या जयंतीनिमित्त चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन) आज त्यांच्यावरील एक चरित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून 31 ऑक्टोबर रोजी हा माहितीपट चित्रपट विभागाच्या संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे.

 

एक दूरदर्शी स्वातंत्र्यसेनानी-नेते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन (राष्ट्रीय एकता दिवस) साजरा केला जातो.

 

लोहपुरुष : सरदार पटेल (20 मि / इंग्रजी / 2001 / विनायक जाधव) या चित्रपटात सरदार पटेल यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्यात आला असून सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून बार्डोली सत्याग्रहातील त्यांची प्रमुख भूमिका यात अधोरेखित करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक प्रमुख भाग म्हणून ती ओळखली जाते. भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून संस्थानांच्या विलीनीकरणात त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवरही यात भर देण्यात आला आहे.

 

हा चित्रपट https://filmsdivision.org/ ‘Documentary of the Week’ विभागावर आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर 31 ऑक्टोबर 2021 रोजी 24 तास दाखवला जाईल.

संबंधित पोस्ट

आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयाने कार्य करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे – वीरमाता अनुराधा गोरे, फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि हजारोंच्या साक्षीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेणार – ना. सुधीर मुनगंटीवार-महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिली विजयाची खात्री

vishwatmaklokswamivarta