vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी…

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी…

रायगड, प्रतिनिधी

:जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रात) पोलीस विभागाची पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था तसेच समुद्रालगतचे भाग हे दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील आहेत.पूर्वी देशातील विविध भागात दहशतवादी व विघातक कारवायांसाठी ड्रोनचा वापर झाल्याची उदाहरणे आहेत.रायगडमध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत ड्रोन उडवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.ड्रोनद्वारे टेहळणी करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता तसेचचोरी व अन्य गुन्ह्यांसाठी ड्रोनच्या माध्यमातून माहिती संकलनाची शक्यता आणि ड्रोनद्वारे केलेले चित्रिकरण विघातक कृत्यांसाठी वापरले जाण्याचा धोका लक्षात घेता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावयाचा असल्यास व्यक्ती, संस्था वा आयोजकांनी ७ दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देवून परवानगी घेणे बंधनकारक राहील.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी स्पष्ट केले आहे.हा आदेश नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असून, दोन महिन्यांसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात विनापरवाना ड्रोन वापरावर बंदी लागू राहील.

000000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पेण तालुक्यातील खारेपाट येथीलपाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार- मंत्री गुलाबराव पाटील

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी; सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट…

vishwatmaklokswamivarta