vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी -केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलै 2025 मध्ये वितरीत केला जाणार आहे. परंतु जिल्ह्यातील 3 हजार 492 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 4 हजार 599 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग(DBT Enable) अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना सन्मान निधीपासून वंचित राहू शकतो. तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई- केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक असून बँक खात्याशी किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करण्याचे काम तत्काळ पूर्ण करून घ्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे बुलढाणा यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

किरकोळ पेट्रोल पंपावरून घाऊक, संस्थांत्मक वापरासाठी इंधन वळविण्यात सक्त मनाई-  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ५२ आदिवासी कुटुंबांसाठीच्या गृहसंकुलाचे लोकार्पण

आरक्षण सुविधेने प्रवास सुखकर होईल: भास्करराव दानवे

vishwatmaklokswamivarta

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta