vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

बुलढाणा, प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महामंडळाच्या योजना व कामकाजाचा आढावा घेतला. महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे दोन दिवशीय शेगांव जि. बुलढाणा दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान अमरावती विभागाची जिल्हा निहाय आढावा बैठक शेगांव विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजी नगर विभागीय समन्वयक प्रवीण आघवन, अमरावती विभाग अमेय परब, छत्रपती संभाजी नगर जिल्हा समन्वयक शुभम खरात, बुलढाणाचे पुरुषोत्तम अंभोरे वैभव मुंढे, सुरज जगताप तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा समन्वयक व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील एक लाख मराठा युवकांना उद्योजक करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले असून येणाऱ्या काळात लाखो मराठा युवकांना स्वयंरोजगार मिळवून आत्मनिर्भर बनविण्याचा महामंडळ व राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा स्तरावरील अधिकारी, बँकर्स यांच्या सोबत बैठका घेऊन मराठा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच प्रत्येक तालुका निहाय मराठा समाजाची वर्गवारी करणे, बँक प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढणे, नवीन जास्तीत जास्त उद्योजक तयार करण्याच्या सूचना जिल्हा समन्वयक यांना दिल्या. मराठा समाजातील युवकांनी, नेत्यांनी, पदाधिकारी पुढाकार घेऊन विभागातील सर्व तालुक्यात महामंडळाच्या योजनाचा प्रचार व प्रसार करावा व गरजूना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

000000

 

संबंधित पोस्ट

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

हुतात्मा दिन’ निमित्त महाराष्ट्र सदनात हुतात्म्यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती सभापती पद आरक्षण निश्चितीसाठी दि.१६ रोजी बैठक

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय– मंत्री शंभूराज देसाई भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह

एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद