vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फेरफार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती

फेरफार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व नियम १९७१ अन्वये प्रत्येक गावात ठेवण्यात येणाऱ्या अधिकार अभिलेखांमध्ये फेरफार प्रक्रिया पारदर्शक व गतिमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुधारीत कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश सर्व महसूल यंत्रणेला दिले आहेत.

   महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व नियम १९७१ अन्वये प्रत्येक गावात ठेवण्यात येणाऱ्या अधिकार अभिलेखांमध्ये फेरफार प्रक्रिया पारदर्शक व गतिमान करण्यासाठी महसूल विभागाने डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ई-फेरफार सेवा कार्यान्वित केली आहे. मात्र अलीकडील काळात काही अशा तक्रारी आढळून येत आहेत, ज्या तक्रारदारांचा संबंधित फेरफार प्रकरणाशी कोणताही कायदेशीर संबंध नसतो. या अशा तक्रारींमुळे नाहक सुनावण्या घ्याव्या लागतात, फेरफार मंजुरी विलंबित होते, आणि कायदेशीर मालमत्तेच्या हस्तांतरणावर विपरीत परिणाम होतो.   या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी स्वामी यांनी फेरफार प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.सुधारित कार्यपद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी:· तक्रारीची पात्रता तपासणी:

एखाद्या फेरफार प्रकरणावर तक्रार/हरकत नोंदविणाऱ्या व्यक्तीचा त्या जमिनीशी कायदेशीर संबंध आहे की नाही, याची प्राथमिक तपासणी केली जाईल. संबंध नसल्यास तक्रार अमान्य मानून सुनावणीस पात्र ठरवले जाणार नाही.· फक्त वैध तक्रारींवरच सुनावणी:केवळ हितसंबंधित किंवा नोंदणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरच सुनावणी घेतली जाणार आहे.

 बिनआधार तक्रारींवर कारवाई:जाणूनबुजून चुकीच्या किंवा बिनआधार तक्रारी करून प्रक्रिया अडवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकरणांचा नोंदवहीत समावेश करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या सुधारित धोरणामुळे फेरफार प्रक्रिया अधिक प्रभावी, गतिमान व कायदेशीरदृष्ट्या अधिक बळकट होणार आहे. नागरिकांना वेळेत व अचूक सेवा मिळणे सुनिश्चित होणार असून, महसूल विभागाच्या पारदर्शकतेत वाढ होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी सुधारित कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. कोणतेही फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

००००

संबंधित पोस्ट

दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

जबाबदार पर्यटन’ विषयक पथनाट्याव्दारे जनजागृती कोकण विभागीय पर्यटन कार्यालयाचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पाकिस्तानच्या वाढत्या तणावात- केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या संपूर्ण देशात देशव्यापी सुरक्षा मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत