सेवासंकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा उपलब्ध
बुलढाणा, प्रतिनिधी : नागरिकांच्या सोयीसाठी सेवासंकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिस येथे आधार नोंदणी व आधार दुरुस्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आधारशी संबंधित आवश्यक सेवा आता स्थानिक पातळीवरच घेता येणार आहेत.
देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमधील आधार सेवा केंद्राची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. नवीन आधार नोंदणी तसेच आधारमधील आवश्यक दुरुस्ती व अद्ययावतीकरणासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आधारशी संबंधित कामांसाठी नागरिकांना दूरवर जाण्याची आवश्यकता भासू नये आणि स्थानिक पातळीवर सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. देऊळगाव राजा व परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये येऊन आधार सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, बुलढाणा विभाग, बुलढाणा यांच्याकडून करण्यात आले आहे.