vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

बुलढाणा, प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असतानाही प्रवेश न मिळालेल्या तसेच इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालये अथवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी-सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करावा. मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही योजनेच्या निकषांनुसार नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. परिपूर्ण भरलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयात जमा करावेत. ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक-फौजदारी कारवाई कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना  …

लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम • मेहकरमधील विविध विकासकामांचे लोकार्पण

विरोधकांच्या या असंसदीय वर्तनाचा, चर्चेपासून पळ काढण्याच्या वृत्तीचा आणि NEET वर अपप्रचार करण्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने केली.

vishwatmaklokswamivarta

माध्यमिक; उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दक्षता समिती बैठक कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू