दिल्लीत जंतरमंतर होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
राज्य प्रतिनिधी-
उद्या दिल्लीत जंतरमंतर होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
जंतरमंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान १० दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं.
सीजेपीला यापूर्वीही जंतरमंतर वर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्वं आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, असं दिल्लीच्या पोलिस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं.
संविधानाचे नियम नियम मोडून जबरदस्तीने दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या कॉआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.