तालुका : खुलताबादसेवा संकल्प अभियानांतर्गत डोंगरगाव शिव येथे आरोग्य शिबिर
आरोग्य प्रतिनिधी-सेवा संकल्प अभियानांतर्गत HWC शिरोडी अंतर्गत डोंगरगाव शिव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १५७ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली
तपासणीदरम्यान ५ नवीन उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ३ नवीन मधुमेहाचे रुग्ण तसेच २ संशयित क्षयरुग्ण आढळून आले. संबंधित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात आरोग्य, पोषण व महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांना संतुलित आहार, पोषण, ॲनिमिया प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता व निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले
महिलांना महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच महिला बचत गटांचे महत्त्व, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण, उपलब्ध शासकीय योजना आणि त्यांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रगती, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.