vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात 16 हजारांहून अधिक निरक्षरांनी दिली नवसाक्षरता चाचणी

जिल्ह्यात 16 हजारांहून अधिक निरक्षरांनी दिली नवसाक्षरता चाचणी

जालना, प्रतिनिधी: केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान ही मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासोबतच आर्थिक, कायदेविषयक व डिजिटल साक्षरता, आरोग्यविषयक जागरूकता आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

सन 2026-27 या वर्षात जालना जिल्ह्यातील एकूण 67 हजार 998 निरक्षरांना साक्षर करण्यासाठी 7 हजार 965 स्वयंसेवकांनी कार्य सुरू केले आहे. याच उपक्रमांतर्गत 25 ऑक्टोबर 2026 रोजी रविवारी आयोजित नवसाक्षरता चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील 1 हजार 669 केंद्रावर 23 हजार 698 निरक्षरांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 15 हजार 877 महिला आणि 7 हजार 821 पुरुषांचा समावेश होता.

तालुकानिहाय परीक्षेला उपस्थित राहिलेल्या निरक्षरांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुक्यात 2 हजार 954, बदनापूर 2 हजार 940, अंबड 3 हजार 476, घनसावंगी 2 हजार 110 , परतूर 1 हजार 762, मंठा 3 हजार 465, भोकरदन 4 हजार 583 आणि जाफराबाद तालुक्यात 2 हजार 407 निरक्षरांनी चाचणी परीक्षेत सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षेच्या आयोजनासाठी शिक्षणाधिकारी (योजना) लता सानप, उपशिक्षणाधिकारी (योजना) रवी जोशी, सहायक योजना अधिकारी वसीम पटेल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन सहकार्य केले. जिल्ह्यातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करून त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ५२ आदिवासी कुटुंबांसाठीच्या गृहसंकुलाचे लोकार्पण

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात हळदी समारंभादरम्यान सुमारे २५ जणांना अन्नातून विषबाधा झाली.

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी- पालकमंत्री शंभूराज देसाई