vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

परंपरेला आधुनिकतेची जोड देत सहकार क्षेत्रात नवी दिशा देण्याचा संकल्प, श्री धिरज निलेश सांबरे यांच्या नागरी सत्कारासाठी टोकावड्यात जनसागर!

परंपरेला आधुनिकतेची जोड देत सहकार क्षेत्रात नवी दिशा देण्याचा संकल्प, श्री धिरज निलेश सांबरे यांच्या नागरी सत्कारासाठी टोकावड्यात जनसागर!

राज्य प्रतिनिधी-टोकावडे, ता. मुरबाड, जि. ठाणे, : जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी श्री. धिरज निलेश सांबरे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल टोकावडे येथील स्थानिक नागरिक व हितचिंतकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी टोकावडे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून श्री. धिरज निलेश सांबरे यांचा सन्मान केला.

यावेळी श्री. धिरज निलेश सांबरे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि युवकांशी संवाद साधत बँकेच्या भविष्यातील वाटचालीबाबत आपले विचार मांडले. आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बँकिंग क्षेत्रात डिजिटल सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा आणि युवकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी उपस्थितांशी चर्चा केली.

केवळ पारंपरिक पद्धतीने बँकेचा कारभार न करता नव्या पिढीच्या कल्पना, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांची सांगड घालून बँकेला प्रगतीच्या नव्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन, युवकांसाठी आर्थिक साक्षरता, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी आणि सर्वसामान्य ग्राहकांना सुलभ बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. युवा नेतृत्वाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या विचारांची यावेळी चर्चा झाली

जिजाऊच्या कार्याचा मुरबाडमध्ये गौरव; ५०० हून अधिक युवकांना शासकीय सेवेत संधी!या सोहळ्यात नागरिकांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ठाणे जिल्ह्यातील ४,१३४ जिजाऊ विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत स्थान मिळवले असून, त्यापैकी ५०० हून अधिक विद्यार्थी एकट्या मुरबाड तालुक्यातील आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शन, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक युवकांचे शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकार झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, आरोग्यसेवा, अत्याधुनिक रुग्णालये, वाचनालय,वह्या वाटप, पोलीस भरती प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने उभे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे नागरिकांनी नमूद केले. विशेषतः मुरबाड तालुक्यातील ५०० हून अधिक युवकांना शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. संस्थापक श्री निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांनी गौरवोद्गार काढले.

सामाजिक कार्याचा वारसा आणि आधुनिक युवा विचारांची सांगड घालत श्री. धिरज निलेश सांबरे यांनी सहकार क्षेत्रात नवी दिशा निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. युवकांना केवळ संधी देणारे नव्हे, तर त्यांना विकासप्रक्रियेचे भागीदार बनविणारे नेतृत्व उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.या नागरी सत्कार सोहळ्यामुळे संपूर्ण टोकावडे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी श्री. धिरज निलेश सांबरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

संबंधित पोस्ट

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा,कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहननवी मुंबईत ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न