vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एसआयआर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*रायगड जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा; जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सादर केली प्रक्रियेची माहिती*

*एसआयआर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*रायगड जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा; जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सादर केली प्रक्रियेची माहिती*

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज रायगड जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत ऑनलाइन बैठक संपन्न झाली. या बैठकीत रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. बैठकीस अपर आयुक्त (प्रशासन) श्रीमती फरोग मुकादम, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात एसआयआर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील पुनरीक्षण प्रक्रियेची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या प्रक्रियेच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील एसआयआर प्रक्रियेची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती सादर केलीमतदार याद्यांचे पुनरीक्षण अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

*******

संबंधित पोस्ट

महसूल विभागाचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्र्यांनी शिर्डीत घेतला जनता दरबार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी अंकाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेला बळ; ग्रामीण उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांची दिवाळी अंकात मांडणी

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आजोबा गणपतीचा ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६ उत्साहात

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार

दोषींची गय केली जाणार नाही-टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी- मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त गुजरातमधील #केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र #पर्यटन विभाग सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta