vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

निर्लेखित साहित्याच्या विक्रीकरिता जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनीसिलबंद निविदा सादर कराव्यात

निर्लेखित साहित्याच्या विक्रीकरिता जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनीसिलबंद निविदा सादर कराव्यात

 

रायगड-अलिबाग प्रतिनिधी:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले यंत्रसामुग्री साहित्यांचा समावेश आहे. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड एम.बी.गवई यांनी केले आहे.

विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधीत विभागामध्ये दि. 18 नोव्हेंबर ते दि.27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल.

    या नमुन्यातील पूर्ण माहीती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल या रक्कमेचा भरणा प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड या नावाने डी.डी. च्या स्वरुपात करावा. इच्छुक जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदी दारांनी वर उल्लेख केलेल्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज डी.डी. सह (प्रपत्र अ व प्रपत्र ब करीता वेगळे स्वतंत्र लिफाफा द्यावा) दि.30 नोव्हेंबर 2026 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळून सिलबंद लिफाप्यात कार्यालयात जमा करावा.

     संपूर्ण निविदा प्रक्रीया रद्द करण्याची किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यांनी राखून ठेवला आहे. या सिलबंद निविदा दि.02 डिसेंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वा. संस्थेच्या प्राचार्याच्या कक्षात उघडण्यात येतील .

000

संबंधित पोस्ट

टीसीएस’मध्ये दीडशे पदे भरणार; जिल्ह्यातील युवकांना संधी अकोल्यात १५ एप्रिलला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टोयोटा कंपनीत ‘कमवा व शिका’ अंतर्गत संधी

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना ; गरजू लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती;अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम