vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जत येथे पारधी समाजाचा मेळावा– विविध शासकीय दाखले व योजनांच्या लाभांचे नागरिकांना वितरण

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जत येथे पारधी समाजाचा मेळावा– विविध शासकीय दाखले व योजनांच्या लाभांचे नागरिकांना वितरण

        सांगली, प्रतिनिधी: क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जत येथे पारधी समाजातील नागरिकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना आवश्यक असलेले जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचे दाखले तसेच आयुष्मान भारत कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

       जत येथील नदाप हॉलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आणि जत तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जत पंचायत समितीच्या सभापती अर्चना पाटील, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावचे प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसीलदार श्री. माने, देवराज चव्हाण, बसवराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास यांसह विविध क्षेत्रांतील योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले     या मेळाव्यामुळे पारधी समाजातील नागरिकांना विविध शासकीय दाखले व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. या उपक्रमास पारधी जमातीतील सुमारे ३०० ते ३५० नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

00000

 

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य; गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र सदन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

पोलादपूर नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उद्योगस्नेही धोरण व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि ऐतिहासिक वारसाएआयच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा– पर्यटन मंत्री शंभूराज देसाई प्रतापगडावरील शिवप्रताप दिन शौर्य स्मारक आणि वीर जिवाजी महाले पुतळा उभारणीच्या कामांचा आढावा

vishwatmaklokswamivarta