vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला, विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त

काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त…

मुंबई:  प्रतिनिधी :काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव या पदासाठी फिक्स झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार

दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. राज्यपालांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून उद्या निर्णय कळवणार असल्याचं सांगितल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरचा. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीत झालं. त्यांनी राजस्थानच्या बीआयटीस पिलानीमधून बीई-ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमएसची पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते.

संबंधित पोस्ट

अंगावर डिझेल ओतून ४४ वर्षीय व्यक्तीने मंत्रालयासमोर मादाम कामा रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल.

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती; जाणून घ्या दिल्ली, मुंबईसह इतर शहरातील नवीन दर

शासकीय आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना 31 मार्च रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

देशातील बँक घोटाळ्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी; RBI ची धक्कादायक माहिती