vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नव्या दिल्लीत स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला..? सोनिया गांधीही बघत राहिल्या..

 स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला..? सोनिया गांधीही बघत राहिल्या..

 

नवी दिल्लीः प्रतिनिधी काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल, तर कोणी आणखी काही. मात्र, हे टाळता आले असते. त्याने काँग्रेसची नाहक होणारी नाचक्की, त्यातून उठणारी शब्दांची राळ, अन् हसे झाले नसते. मात्र, काही-काही घटनांची दोरी कुणाच्या हाती नसते, हेच खरे. त्याचे झाले काय की, काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली खरी. मात्र, तो झेंडा त्यांच्याच हातावर येऊन पडला. तेव्हा सारेच सैरभर झाले.

ऐतिहासिक नोंद…

वर्धापन दिनी गालबोट…

काँग्रेसच्या या ऐतिहासक वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा कार्यक्रम आज होता. मात्र, यावेळी गालबोट लागल्याचे दिसले. सोनिया गांधी यांनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली. पक्षाचा झेंडा वर गेला. मात्र, काही क्षणातच तो झेंडा त्यांच्या हातावर येऊन पडला. यामुळे क्षणभर सोनिया गांधी सुद्धा अवाक झाल्या. त्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी आणि कार्यकर्ते सैरभर झाले. मात्र, सोनियांनी संयमाने परिस्थिती हाताळली. पुन्हा एकदा रितसर झेंडा फडकावण्यात आला. मात्र, ऐन वर्धापन दिनी ही घटना घडल्याने याची चर्चा चांगलीच रंगलीय

संबंधित पोस्ट

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क लोकसभा निवडणूक २०२४: रामटेक मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार; शुक्रवारी मतदान

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक…

आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-मंत्री अतुल सावे

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन…

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

उंटांची राजस्थानातून हैदराबादकडे अवैधरित्या वाहतूक, पोलिसांकडून जीवनदान,येथील प्राणी प्रेमी यांच्या सतर्कतेने.

vishwatmaklokswamivarta